अहिल्यानगर (गणराज्य न्यूज)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आज (२५ नोव्हेंबर) मंगळवारच्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडतात की जैसे थे स्थिती राहते याकडे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील विविध पक्षांचे नेते, उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत.
या आधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा ओलांडल्याबद्दल राज्य सरकारवर
ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सोयीस्कर राज्य सरकारने सोयीने अर्थ काढून २७ टक्के ओबीसी आरक्षण दिल्यावरून खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. आता यावर आज सुनावणी सुनावणी होत आहे.













