राहुरी : नगरपरिषद निवडणूकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वेगळे वळण लागले असून तनपुरेवाडी येथील प्रभाग क्रमांक ३ येथील उमेदवारांच्या फ्लेक्स बोर्डला काळे फासल्याचा प्रकार घडला आहे.सदर प्रकार शनिवारी सकाळी लक्षात येताच विकास आघाडीचे उमेदवार व सर्व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा जाहीर निषेध केला. पराभव दिसू लागल्याने विरोधकांकडून नको ते उद्योग सुरू झाले असल्याचा आरोप तनपुरे समर्थकांकडून करण्यात येत आहे.















