राहुरी – नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी 6 वाजता विजयी संकल्प सभा होत आहे.यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील कार्यकर्त्यांना व मतदारांना मार्गदर्शन करताना नेमकी काय बोलणार? याकडे राहुरी शहराचे लक्ष लागून आहे.यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील,आमदार संग्राम जगताप,जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.मतदानापूर्वी भाजपची शेवटीची जाहीर सभा होत असल्याने आजची सभा महत्वपूर्ण ठरणार आहे.














