राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथील छत्रपती शिक्षण संस्था संचलित जय हिंद करिअर अकॅडमीच्या वतीने मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता महा-डेमो पोलिस भरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक श्री डी.के मोरे सर यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
महा-डेमो पोलिस भरतीसाठी सहभागी होण्यास इच्छुक युवक व युवतींनी सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी पर्यंत फक्त 325 रुपये शुल्क भरून नाव नोंदणी करून आपले रजिस्ट्रेशन करावे. पोलीस भरती करणाऱ्या तरुण व तरुणींसाठी जय हिंद करिअर अकॅडमीच्या वतीने एक सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त इच्छुकांनी मोठ्या संख्येने रजिस्ट्रेशनसाठी 9421917777 या क्रमांकावर संपर्क करून आपली नाव नोंदणी करावी.
सुसज्ज व प्रशस्त मैदानात नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन बहुमोल ठरणार आहे.दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता मैदानावर प्रत्यक्ष डेमो होणार आहे. यामध्ये शंभर मिटर,आठशे व सोळाशे मीटर धावणे चीप सेन्सरच्या साह्याने होणार आहे.तसेच गोळा फेक आणि ओएमआर उत्तर पत्रिका पद्धतीने शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.. पेपर तपासणी व ग्राउंड आणि लेखी एकत्रित गुण मिळणार आहे.अगदी पोलीस भरती प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
See also: Global English Creativity
तरी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घ्यावा.असे जय हिंद करिअर अकॅडमीचे समन्वयक सिद्धांत मोरे यांच्याकडून करण्यात येत आहे.















