Home महाराष्ट्र ब्राम्हणीत श्री मच्छिंद्रनाथ यात्रा उत्सव

ब्राम्हणीत श्री मच्छिंद्रनाथ यात्रा उत्सव

2
0

राहुरी : तालुक्यातील ब्राह्मणीत गुरुवार १९ रोजी श्री मच्छिंद्रनाथ यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नाथ भक्तांनी दिली.देवी मंदिर प्रांगणातील पुरातन श्री मच्छिंद्रनाथ मंदिराचा ब्राह्मणी व परिसरातील नाथ भक्त परिवाराकडून जीर्णोद्धार होत असून सध्या कळसाचे काम प्रगतीपथावर आहे.

सदर मंदिरामध्ये श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांची अखंड भारत वर्षातील सिद्धासनावर आरूढ असलेली सर्वात भव्य अशी मूर्ती आहे.

नाथ सिद्धांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मंदिर परिसरामध्ये गुढीपाडवा या हिंदू नववर्षा निमित्त श्री नाथ भक्त परिवाराकडून १८ ते १९ मार्च असा दोन दिवसीय श्री मच्छिंद्रनाथ यात्रा महोत्सव आयोजित केलेला आहे.

यामध्ये प्रवरासंगम परिसरातून अमृतवाहिनी प्रवरेच्या आणलेल्या कावड जलाने श्री मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ मूर्तीस जलाभिषेक करण्यात येणार आहे. गुरुवर्य बालयोगी सद्गुरु शिवदत्त स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यज्ञ होम हवनाद्वारे आसमंत शुद्धी बरोबरच श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांची छबिना मिरवणूक होणार आहे. या यात्रोत्सवानिमित्त जागरण गोंधळाबरोबरच महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाथभक्त परिवाराकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here