Home राहुरी अभिवादन

अभिवादन

177
0

राहुरी : कृषि उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची पुण्यतीथी तर,राहुरी तालुक्याचे शिल्पकार स्व.डॉ. दादासाहेब उर्फ बाबुराव बापुजी तनपुरे यांची 109 वी जयंती  रक्तदान करुन उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते ह.भ.प. आबासाहेब वाघमारे साहेब होते. यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, संचालक चंद्रकांत पानसंबळ, रामदास बाचकर, डॉ. तनपुरे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक विजय डौले, सामाजीक कार्यकर्ते विजय माळवदे, वराळे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना श्री. वाघमारे यांनी स्व. दादांच्या अनेक आठवणींना उजाळा देत राहुरी तालुक्याच्या जडणघडणीमध्ये अतिशय प्रतीकुल परस्थीतीतून दादांनी मुळा धरण, कृषी विद्यापीठ, बाजार समिती, सुतगिरणी, तनपुरे सहकारी साखर कारखाना, मुळा प्रवरा विज संस्था या सारख्या वैभवशाली वास्तूंची कशी निर्मीती केली याची माहिती दिली. मुळा धरणामुळे तालुक्यातील अनेक गावे ही ओलीताखाली आली व तालुक्याच्या विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगीतले. सभापती तनपुरे यांनी स्व. गाडगे बाबा व अजोबा स्व. बापुजी तनपुरे यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध तसेच महाराष्ट्रातील पहिली आश्रम शाळा सुरु करतांना स्व. दादांनी गाडगे बाबांना केलेली मदत याची सर्वांना माहिती दिली. प्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक प्रभाकर पानसंबळ, ज्येष्ठ संचालक सुरेश बाफना, उपसभापती गोरक्षनाथ पवार, संचालक बाळासाहेब खुळे, महेश पानसरे, रखमाजी जाधव, दत्तात्रय कवाणे, भाऊसाहेब खेवरे, सुभाष डुक्रे, दत्तात्रय शेळके, मंगेश गाडे, रामदास बाचकर ,मारुती हारदे, आडते व्यापारी, खरेदीदार व्यापारी, हमाल, तोलणार, शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी बाजार समितीच्या सन 2024 च्या दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले. सुत्रसंचालन संचालक दत्तात्रय कवाणे केले व आभार सचिव भिकादास जरे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here