: जुन्या पिढीतील जेष्ठ व मातृतुल्य व्यक्तिमत्व गं.भा गयाबाई गणपत तनपुरे यांचा उद्या शुक्रवार १५ डिसेंबर रोजी दशक्रिया विधी…..त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली……
गं.भा गयाबाई गणपत तनपुरे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन झालं.आयुष्यभर अपार कष्ट केले. अखेरपर्यंत निरोगी आयुष्य जगलेल्या स्व.गयाबाई आज्जी पांडुरंगाच्या भक्त होत्या. पंढरपूरच्या अनेक पायी वारी केल्या. मुलांना चांगलं घडवलं. नातवंडांना चांगले संस्कार दिले.आज आजीला जावून दहा दिवस पूर्ण झाले.














