राहुरी : स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपणास शेतकऱ्यांना स्वतः लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पोरांनी शांत न बसता तसेच आत्महत्या न करता आलेल्या परिस्थितीत सामोरे जावे. तसेच पांढरपेशी पुढाऱ्यांना दिसेल त्या ठिकाणी गोळ्या घालाव्यात. आमच्या मान्य मान्य न झाल्यास त्यांना गोळ्या घातल्याशिवाय गप्प बसणार नाही असा ठणठणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आंदोलनावेळी प्रशासनाला दिला आहे.
मंगळवार 12 डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर भजन गाण्यात आले. तसेच रस्त्यावर दूध ओतत सरकारचा विविध मागण्यांसाठी निषेध व्यक्त केला. यावेळी पुढे बोलताना मोरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कोणत्याच प्रकारच्या शेतीमालाला भाव नाही. दुसऱ्या बाजूला रासायनिक खते बी बियाणे यांचे भाव वाढत आहे. या आंदोलनातून काहीतरी मार्ग काढा अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही. भाजप सरकार हे पैसे देऊन आमदार फोडर्यांचे तसेच सरकार स्थापन करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची सुविधा नाही. यांचे सगळीकडूनच शोषण होत आहे. दुधाला 3.5/8.5ला 35 रुपये भाव मिळावा. केंद्र शासनाने कांद्याची केलेली अचानक निर्यात बंदी तात्काळ उठावी. साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीवर केलेली बंदी त्वरित मागे घ्यावी. मागील वर्षी अवकाळी मुळे झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई अद्याप पर्यंत मिळालेली नसून ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी. इतर राज्यांमध्ये दुधाला कायमस्वरूपी पाच रुपये अनुदान आहे तर आपल्याकडेच का नाही ? शेतकऱ्यांचे सर्व पैसेही आमदार खासदार फोडण्यात तसेच सत्ता कायम ठेवण्यासाठीच खर्च केले जात आहे.
यावेळी मागण्यांचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार रजपूत व पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी स्वीकारले…
यावेळी राजू शेटे, दीपक तनपुरे, दिनकर पवार, प्रमोद पवार, प्रकाश देठे, सचिन म्हसे, किशोर वराळे, विशाल हापसे, रियाज पटेल, अशोक तागड, गणेश रिंगे, चंद्रकांत गागरे, रवींद्र कदम, राजू बाचकर आदींसह शेकडो शेतकरी,व्यापारी व मापाडी यावेळी उपस्थित होते.
——
मौतीचे अभंग गात केले आंदोलन
शेती पिकाला कुठल्याच प्रकारचा भाव मिळत नाही. खर्च जास्त व उत्पादन कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी जिवंतपणीच सरकारने मारला आहे.या सर्व परिस्थितीला कंटाळून भर रस्त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समोर मौतीचे अभंग गात निषेध व्यक्त केला.
जायकवाडी ला खरंच पाणी पोहोचले का ?
समन्यायी कायदा हा फक्त नावालाच आहे. जायकवाडीला पाणी गेले नसून ते पाणी मधीच वाया गेले आहे. त्यामुळे जायकवाडी चा उन्हाळा तर केलाच परंतु आमचा देखील उन्हाळा या सरकारने केला आहे. त्यामुळे सामान्य कायदा हा फक्त नावालाच आहे का ? आशी संतप्त भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.