Home महाराष्ट्र बहिरोबा मंडळाच्या बाप्पाच विसर्जन

बहिरोबा मंडळाच्या बाप्पाच विसर्जन

69
0
filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 90; hdrForward: 0; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0001,0.0000; brp_del_sen: 0.1000,0.1000; delta:1; bokeh:1; module: portrait;hw-remosaic: false;touch: (0.13305573, 0.5203349);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (200, 0);aec_lux: 304.9983;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 37;zeissColor: bright;

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: ब्राम्हणी : बहिरोबा गणेश मंडळाच्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी सायंकाळी निरोप देण्यात आला.दहा दिवस एक मोठं कुटुंब तयार करून दररोज सायंकाळी अन्नछत्र (महाप्रसाद भोजन) सुरू ठेवणाऱ्या मंडळाच्या सदस्यांना बाप्पाला अखेरचा निरोप देताना गहिवरून आले.अनेक वर्षाची मंडळाची मोठी परंपरा,विविध उपक्रम,वर्षभर अध्यात्मिक कार्य आदींची कार्य सुरू असते. यावर्षीपासून दहा दिवस अन्नदान सेवा केली.
श्री गणेशोत्सवानिमित्त बुधवार 3 सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने महिलांसाठी खेळ पैठणी कार्यक्रम घेण्यात आला.परिसरातील
महिला भगिनींनी उदंड प्रतिसाद देत विविध खेळात सहभागी होत आनंद लुटला.

प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करत लहान मुले, मुली,तरुणी,महिला,आजीबाई यांचे विविध खेळ घेतले.दरम्यान उखाणे,कॉमेडी,गप्पा,गोष्टी, प्रश्नमंजुषा याद्वारे सर्वांना हसविले.

खेळातील व लकी ड्रॉ तील
विजेत्या एका महिला साडी व अन्य महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

दरवर्षी महिलांना एक दिवस हक्काच व्यासपीठ मिळते.त्याबद्दल सर्व महिलांनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.रात्रीचे 12 वाजले तरी उपस्थित सर्वांचा उत्साह कायम होता.जेष्ठ महिलांनी सहभागी होत कार्यक्रमाची रंगत वाढवली.अन् सर्वांना पोट धरून हसवले. मंडळाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खेळातील विजयाबद्दल रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले.पुढच्या वर्षी पुन्हा अशाच कार्यक्रमाच आयोजन करण्यात यावं अशी मागणी महिलांनी मंडळाच्या सदस्यांकडे केली.अविस्मरणीय असा मनोरंजनात्मक कार्यक्रम कायम आठवणीत राहील.अशा भावना व्यक्त करत कार्यक्रमाचा उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल लहान लेकरांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनी निवेदक पत्रकार गणेश हापसे यांचे विशेष कौतुक केल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here