
ब्राम्हणी
श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमीत हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) देवाची आळंदी यांच्या कृपाआशीर्वादाने सोमवार 1 सप्टेंबर पासून भागवताचार्य हभप निवृत्ती महाराज नाटकर (जालना) यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीत श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला.
पहिल्याच दिवशी ब्राम्हणी गावातील भाविक श्रोत्यांनी कथा श्रवणासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशीची आरती बाळासाहेब देशमुख,भाऊसाहेब खोसे , चंद्रकांत नवाळे, वेणुनाथ राजदेव,कार्यक्रमाचे आयोजक दिपक देशमुख यांनी सपत्नीक आरती केली.
7 सप्टेंबर पर्यंत दररोज सायंकाळी 7 ते 9.30 या वेळेत माऊली फर्निचर सिमेंट स्टीलचे विक्रेते नामदेव सर्जेराव देशमुख यांच्या खळवाडीतील निवासस्थानासमोर कथा होत आहे. तरी भाविकांनी या कथा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात येत आहे.












