ब्राह्मणी: गावात आज 25 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मंडळाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले आहे.यानिमित्त अहिल्यानगरचे नूतन जिल्हाधिकारी पंकज आसिया ब्राम्हणीत येत असल्याची माहिती कामगार तलाठी जालिदर पाखरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.
सुरवातीला राहुरी तहसील येथे आयोजित बैठक,कार्यक्रम पूर्ण करून ब्राह्मणी येथे येतील.पुढे संगमनेरला दुपारी 2 वाजता नियोजित बैठका आहेत.वेळेनुसार पुढे बदल होवू शकतो.अशी माहिती राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राम्हणीचे मंडळाधिकारी विश्वास आढस यांनी केले आहे…













