Home महाराष्ट्र तनपुरे यांचा पक्ष प्रवेश….

तनपुरे यांचा पक्ष प्रवेश….

62
0

 

गणराज्य न्यूज राहुरी : डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन व बाजार समिती सभापती अरुण तनपुरे व त्यांचे सुपुत्र तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी आज मंगळवारी रात्री ८.३० वाजता देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित दादा गटात सामील होणार अशी चर्चा सुरू असताना त्यांच्या प्रवेशाला आज अखेर मुहूर्त मिळाला आहे.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत , राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी शिष्टाईने हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

सभापती अरुण तनपुरे व युवा नेते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,आ.शिवाजीराव गर्जे, आ.काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत , राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, अनिल सुराणा आदी उपस्थित होते .

याबाबत जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेशाबाबत चर्चा व बैठका सुरू होत्या. मात्र आज अखेर अजित दादांच्या उपस्थित प्रवेश पार पडल्याने निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे.

राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्याशी याबाबत संपर्क केला असता ते म्हणाले की, तनपुरे साखर कारखाना अरुण साहेब तनपूरे यांच्या ताब्यात आल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या असून आज अजित पवार गटात अरुण तनपूरे व हर्ष तनपुरे यांनी प्रवेश केला असून निश्चित कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील व हा कारखाना सुरू होईल.

दरम्यान येत्या आठवड्यात अरुण तनपुरे यांना मानणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते.

दरम्यान माजीमंत्री प्राजक्त तनपूरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांनी अजित दादा गटात प्रवेश केल्याने प्राजक्त तनपुरे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here