ब्राम्हणीच्या मातीतील जुन्या काळातील पैलवान शंकर अण्णा मोकाटे यांचे आज 8 जून रोजी सायंकाळी निधन झाले.निधनाची बातमी ऐकून कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली.
जुन्या काळात अनेक कुस्ती मैदान गाजवत कुस्तीत ब्राम्हणीच गावच नाव अहिल्यानगर जिल्हासह राज्यभर गाजवल. प्रसिद्ध व नामवंत जुन्या मल्लांना त्यांनी चितपट केले.आपल्या परिसरात नवीन पोरं तयार व्हावीत.यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केला.एवढ वय होवूनही आण्णांनी कुस्तीशी नात तोडले नाही. शेवटपर्यंत त्यांनी आपलं पहिलवानकी शरीर जपले.गावोगावी यात्रेनिमित्त होणारे कुस्तीचे आखाडे असो वा विशेष मैदाने असो..अण्णा सहकाऱ्यांना सोबत घेवून उपस्थित राहत असत.छोट्या मैदानापासून महाराष्ट्र केसरीच्या मैदानापर्यंत नामांकित कुस्त्या त्यांनी पहिल्या. संपूर्ण आयुष्य कुस्तीशी एकनिष्ठ राहणाऱ्या अण्णांना बहुतांश पैलवान ओळखत होते.वस्ताद या नात्याने प्रत्येक पैलवान कुस्ती पूर्वी त्यांच्या पाया पडत. जुन्या पैलवाना पासून तर आत्ताच्या अलीकडच्या नवीन पैलवानापर्यंत प्रत्येकाचा कुस्तीत इतिहास अण्णा जाणून होते. चांगल्या पैलवानांची त्यांना पारक होती. चांगल खेळणार एखादा पोरगं त्यांनी पाहिलं.की त्याच्यावर विशेष प्रेम करत त्याला जीव लावायचे.असे कुस्ती प्रिय आण्णा आज कायमचे जग सोडून गेले.आण्णा भावपूर्ण श्रद्धांजली…..
















