Home अहमदनगर ब्राम्हणीत साखर व डाळ वाटप

ब्राम्हणीत साखर व डाळ वाटप

151
0

ब्राम्हणी : अयोध्या येथील श्रीरामाचे मंदिर ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळेच आम्ही साखर वाटप करत आहोत. काहींना आमची साखर कडू लागत असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही. २२ जानेवारीला दिवाळी साजरी होतेय.या सारखा दुसरा आनंद नाही असे प्रतिपादन खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे नागरिकांना साखर व डाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी आ.शिवाजीराव कर्डिले होते.वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे, माजी जि.प.सदस्य विक्रम तांबे, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, विजय बानकर,सोसायटीचे चेअरमन दादासाहेब हापसे, महेंद्र तांबे,सरपंच सौ.सुवर्णा बानकर आदी उपस्थित होते.

खा.डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, ब्राम्हणी गावाच्या व परिसराच्या विकासासाठी आम्ही सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. साखर व डाळ वाटप हा मुद्दा वेगळा आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना होत असताना नैवेद्य म्हणून सर्वांनी दोन लाडू करावेत. एक प्रकारे दिवाळी साजरी करावी असे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात खा.डॉ. विखे पाटील व आम्ही सर्व महिलांना देवदर्शन घडविले. आता साखर व डाळ वाटप होत आहे. विकासाचे कामे तर झालीच त्यासाठी सुमारे ६.५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.परंतु या भावनिक विषयात देखील आमचा पुढाकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना खासदार करायचे आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रास्तविक करताना मा.जि.प.सदस्य विक्रम तांबे यांनी गावातील विकास कामात खा.डॉ. विखे व माजी आ.कर्डिले यांनी मोठा निधी दिल्याचे सांगितले. सरपंच प्रा.सौ.सुवर्णा बानकर यांनी गावातील विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली तसेच पंढरपूर दर्शन व साखर,डाळ दिल्याबद्दल आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here