Home अहमदनगर गुणवंतांचा सन्मान

गुणवंतांचा सन्मान

69
0

ब्राम्हणी : स्व.विलास बानकर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
आज दि.2 जून रोजी करण्यात आला. पंढरी प्रतिष्ठान संचलित स्व.विलास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पालकांनी मनोगत व्यक्त करत स्कूलच्या शैक्षणिक कामगिरी बाबत समाधान व्यक्त केले.यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाल व करिअर संबंधी मार्गदर्शन केले.शाळेच्या प्राचार्य सौ.अश्विनी बानकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बहुसंख्येने शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here