Home महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची संधी

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची संधी

40
0

भारत देशाच्या 15 व्या उपराष्ट्रपतीपदी महाराष्ट्राच्या राज्यपालांना संधी
मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या १५ व्या उपराष्ट्रपतीपदी बहुमताने निवड झाली आहे. त्यांनी १५२ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला.

संसदेत पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण ७६७ खासदारांनी मतदान केले होते. त्यातील ७५२ मते वैध ठरवण्यात आली. यामध्ये एनडीएचे उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. १५२ मतांनी राधाकृष्णन यांचं पारडं जड झालं आणि त्यांना उपराष्ट्रपतीपद मिळाले आहे.

दरम्यान, या निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटली आहेत. त्यात महाराष्ट्रातील शरद पवार गटाची दोन आणि उध्दव ठाकरे गटातील पाच मते फुटल्याचा दावा युतीच्या नेत्यांनी केला आहे.

उपराष्ट्रपती म्हणून ते राज्यसभेचे अध्यक्षपद सांभाळतील आणि राष्ट्रपती अनुपस्थितीत कार्यवाहक राष्ट्रपतीची जबाबदारी पार पाडतील. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कार्यरत असलेल्या व्यक्तीला देशाच्या उपराष्ट्रपती पदाची संधी ऐतिहासिक ठरणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here