राहुरी:तालुक्यातील चेडगांवमधील पाटाचा पुल ते भवानी माता मंदीर रस्त्यावरील खड्डे प्रश्नी तरुणांनी ग्रामसभेत आवाज उठविताच सदर प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी त्या तरुणांचे अभिनंदन करत कौतुक केले.
चेडगांवची ग्रामसभा विविध मुद्यांनी गाजली. नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे येथून वाहतूक करण्यात येणारा मुरूम चेडगांव मार्गे राहुरी तालुक्यातील विविध गावात जातो. मोठ्या डंपरची जड वाहतूक असल्याने रस्ते वारंवार खराब होतात. मोठमोठे खड्डे पडल्याने रात्री अपरात्री प्रवास करताना अडचणी येतात. ग्रामपंचायत दुर्लक्ष का करते? नेमकी कारण काय? तुम्ही मुरूम वाहतूक करणाऱ्या व्यक्तीबद्दल मेहेरबान का?असा प्रश्न उपस्थित करत तरुणांनी चांगलीच ग्रामसभा गाजविली. पदाधिकारी निरुत्तर झाले.
दरम्यान संजय तरवडे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने प्रश्न उपस्थित करणारे महेश तरवडे,तुषार तरवडे,मनोज तरवडे गोरख म्हसे,बाळासाहेब म्हसे,गणेश तरवडे,विलास तरवडे आदींना आश्वासन देवून अखेर खराब रस्त्यावर मुरूम टाकला.जेसीबीच्या साह्याने तो पसरविण्यात आल्याचे महेश तरवडे यांनी सांगितले.













