Home महाराष्ट्र मोफत नेत्र तपासणी शिबिर

मोफत नेत्र तपासणी शिबिर

2
0

गणराज्य न्यूज राहुरी फॅक्टरी 

सत्कार्याच्या जोरावर साई आदर्श मल्टीस्टेटने उंच भरारी घेऊन प्रगती साधली असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे यांनी केले.

साई आदर्श मल्टीस्टेटच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित् बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर पार पडले. यातील गरजूंना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम पार पडला. प्रसंगी पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे बोलत होते.

प्रसंगी व्यासपीठावर राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा बँकेचे राहुरी फॅक्टरी शाखाधिकारी राजेंद्र शेरकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक साई आदर्श मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले.

साई आदर्श मल्टिस्टेटच्यावतीने ४० रुग्णांची पुणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली तर जवळपास २०० रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले.

पुढे बोलताना बसवराज शिवपुजे म्हणाले की, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या माध्यमातून नफ्यातील हिस्सा सामाजिक कामात खर्च करून नेहमीच समाजउपयोगी उपक्रम राबवित असतात. सत्कार्याच्या जोरावर साई आदर्श मल्टीस्टेट उंच भरारी घेतली आहे.

यावेळी बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले की, साई आदर्श मल्टीस्टेटने संस्थेच्या हिताबरोबर नेहमी समाजाच काहीतरी देणं लागतो यासाठी उपक्रम राबवून जनसेवेच व्रत जोपासले आहे.

यावेळी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, बाळासाहेब तांबे,अविनाश साबरे,पारस नहार, सर्जेराव शेटे,रामेश्वर तोडमल,अन्सार शेख,भाऊसाहेब गुंजाळ,नाना वाळुंज,विलास तमनर,सुनील गाढे,निलेश शिंदे, तेजस सप्रे,संजय पवार आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख यांनी केले.आभार योगगुरू किशोर थोरात यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श मल्टिस्टेटचे व्यवस्थापक सचिन खडके, याकुब शेख व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here