Home महाराष्ट्र चारीच्या रस्त्यावरची अडचण दूर……..

चारीच्या रस्त्यावरची अडचण दूर……..

49
0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 36;

ब्राम्हणी : ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेसीबीच्या साह्याने घेरूमाळवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची काटेरी झुडपे सोमवारी काढण्यात आली.

चारी क्रमांक चारवरून घेरूमाळ वस्तीकडे रस्ता जातो.बाजूला मोठी काटेरी झाडे वाढल्याने वळणावरच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थित दिसत नव्हते. परिणामी अपघाताची भीती होती. चालताना अंगाला काटे लागत. येणाऱ्या जाणाऱ्यांची होणारी गैरसूल लक्षात घेऊन ब्राह्मणी ग्रामपंचायतकडून लहान-मोठे काटेरी झुडपे जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुणराव बानकर ,भानूआप्पा मोकाटे,देविदास वने, शशिकांत देशमुख यांनी उपस्थित राहून काम करून घेतले.

रस्त्याच्या बाजूची अडचण दूर झाल्याने वस्ती परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here