वांबोरी – गावात दरवर्षीप्रमाणे कुलदैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी माताच्या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. देवीचे माहेर राहुरीवरून तुळजापुरला पालखी जात असताना पालखी वांबोरीतून जात असते.दरम्यान मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने पालखीचे स्वागत दर्शन करण्यासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी पालखीचे स्वागत व आरती वांबोरी गावचे उपसरपंच नितीन बाफना,माजी उपसरपंच पोपट देवकर,सुनील जाधव,प्रशांत साळुंके यांनी केले.