Home महाराष्ट्र निवडणूक आयोगाची तयारी सुरू..

निवडणूक आयोगाची तयारी सुरू..

9
0

गणराज्य न्यूज

राहुरी – २२३-राहुरी
विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे रिक्त जागी लवकरच  पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

या कार्यक्रमात दि. १ जानेवारी २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, या तारखेनुसार मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना दावे व हरकती सादर करण्याची संधी देण्यात आली.असून, हा कालावधी दि. ३ जानेवारी २०२६ ते दि. २४ जानेवारी २०२६ असा राहणार आहे. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून त्यांचा निकाल दि. ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लावण्यात येणार आहे.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, तसेच आवश्यक दुरुस्त्या करून घेण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here