राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असताना पोलिस प्रशासन मात्र,कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यात्रा उत्सव काळात बनावट दारू विक्रीची भिती अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाढते अवैध धंदे गुन्हेगारी वाढीसाठी खतपाणी ठरत असून गावांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.दारू,मटका,सोराट, जुगार यासह अनेक अवैध धंदे ब्राह्मणीत सध्या सुरू आहे.पोलिस मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
अवैध धंद्याच्या नादात अनेकांच्या प्रपंचाचे वाटोळे होत असून कुटुंब आर्थिक अडचणीत येत आहे. दिवसाढवळ्या खुलेआम दारू विक्री सुरू आहे.मटका, सोराट ,जुगार खेळ सुरू आहे.तरी संबंधितावर कारवाई नाही.
शेजारच्या अन्य गावात दारू बंदी होत असताना ब्राम्हणी गावात का होत नाही.असा प्रश्न महिला भगिनी व ग्रामस्थांकडून व्यक्त करत पोलिस प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
परवाना नसताना पान टपऱ्या, चप्पल दुकान,हॉटेलमधून दारू विक्री सुरू आहे.यापूर्वी चोरून लपून खेळल्या जाणाऱ्या मटक्याची दुकाने थाटली आहे.पोलिस प्रशासनास न घाबरता अवैध व्यवसाय जोरात सुरू असल्याचे सध्या दिसून येत.याचा उपद्रव दिवसागणिक वाढत आहे.
दोन दिवस ब्राम्हणी गावचा यात्रा उत्सव आहे.मोठ्या प्रमाणांत दारू विक्री होणार हे निश्चित..यात्रेच्या काळात पुरवठा होणारी दारू विषारी,डुबलीकेट विकली जाण्याची शक्यता आहे. अनेकांकडून याप्रकरणी चिंता व्यक्त केली जात आहे.















