राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी गावच ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रा उत्सवास दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी शनिवार 12 एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे.

शनिवार व रविवार दोन दिवशीय यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे फटाक्यांची आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात गंगाजल कावड मिरवणूक होईल.दरम्यान जगदंबा देवीची विधिवत पूजा व महाआरती होईल. सकाळी देवीला नैवेद्य व सायंकाळी शेरनी मिरवणूक रात्री छबीना मिरवणूक दरम्यान तोफा फटाक्यांची आतिषबाजी (दारूकाम) होईल. त्यानंतर बैल गाडा फेम जुही शेरकर प्रस्तुत 36 नखरेवाली लावणी,ग्रुप डान्स आर्केस्ट्रा कार्यक्रम होईल.
रविवारी सकाळी संगीत हजाऱ्या होतील.दुपारी बैलगाडा शर्यत होवून जगदंबा देवी यात्रा उत्सवाचा समारोप होईल. पुढील पंधरा दिवसांनी बहिरोबा महाराज यात्रा उत्सव आहे.त्यानिमित गतवर्षीप्रमाणे भव्य कुस्ती मैदान व विविध कार्यक्रम होणार आहे.याची सर्वांनी नोंद घ्यावी.आपल्या ब्राम्हणी गावचा यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होत वर्गणी देत सहकार्य करावे.असे आवाहन यात्रा उत्सव समिती सदस्य यांच्याकडून करण्यात येत आहे.
यात्रेनिमित्त जगदंबा देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईं करण्यात आली असून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी सुरेश बानकर,
महेंद्र तांबे,सखाहारी भवार, सतीश तारडे,शिवाकांत राजदेव,भानूआप्पा मोकाटे,अनिल ठुबे,अरुण बानकर,सुनील ठुबे, गिरीधर तारडे, जालिंदर घुगरे आदींसह ग्रामस्थ, तरुण वर्ग प्रयत्नशील आहे.












