ब्राम्हणी : गावच ग्रामदैवत आदिशक्ती जगदंबा देवीचा यंदाचा यात्रा उत्सव शनिवार 12 एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी होत आहे.दोन दिवशीय यात्रा उत्सवाचा नारळ आज रविवारी गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर सायंकाळी फोडण्यात आला.
13 दिवसांवर आलेल्या यात्रा उत्सवाची पूर्वतयारी म्हणून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशीच नारळ फोडला जातो. दुसऱ्या दिवसापासून लगेच लोकवर्गणीला सुरुवात होते.
शनिवार 12 व रविवार 13 एप्रिल अशी दोन दिवस यात्रा उत्सव आहे.दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.त्याची पूर्वतयारी आतापासून सुरू झाली आहे.
रविवारी गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर सायंकाळी नारळ फोडण्यात आला. तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ भागवत रंगनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव समिती काम करणार आहे. कमिटी सदस्य म्हणून सखाहारी भवार,सुरेशदादा बानकर, महेंद्र तांबे,भानूआप्पा मोकाटे, अरुणराव बानकर, दादासाहेब हापसे,शिवकांत राजदेव, सतिष तारडे, कृष्णराव राजदेव, पंडित हापसे,सुनील (नटू) ठुबे, जालिंदर घूगरे, संभाजी (आबा) हापसे गिरीधर तारडे आदींसह अन्य सदस्य काम करत आहेत.
















