ब्राम्हणी : राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यालगत मुक्ताई पेट्रोलियमचा आज सायं 5 वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आई वडिलांच्या हस्ते शुभारंभ होत असल्याची माहिती श्री.अरुण विष्णू कानडे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कानडे परिवाराकडून करण्यात येत आहे.
जगप्रसिद्ध शिर्डी शनिशिंगणापूर महामार्गावरील राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गाव मार्केट,क्षेत्रफळ व लोकसंख्येने सर्वात मोठ गाव समजले जाते. त्या दृष्टीने प्रशस्त,सुविधायुक्त कायमस्वरूपी वाहन – चालक मालकांच्या सेवेत राहील.यासाठी कानडे परिवार भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून मुक्ताई पेट्रोलियम सुरू करत आहे.
साईभक्त शनिभक्त,ब्राम्हणीसह चेडगाव मोकळ ओहोळ,केंदळ,उंबरे, वळण पिंपरी आदींसह परिसरातील विविध गावांना मुक्ताई पेट्रोलियमचा निश्चित फायदा होणार आहे.मुक्ताई पेट्रोलियममुळे ब्राह्मणीच्या वैभवात भर पडली आहे. परिसराची गरज लक्षात घेवून कानडे परिवाराने एक चांगली नवीन सुरुवात केली.
त्याबद्दल सर्वांकडून कौतुक व नवीन वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपण उद्घाटन सोहळ्यासाठी नक्की या.असे आवाहन मुक्ताई पेट्रोलियम यांच्याकडून करण्यात येत आहे.
















