गणराज्य न्यूज मुंबई – राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज महाराष्ट्र विधानसभा सभागृहातील उत्कृष्ट भाषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
आज मंगळवार 3 सप्टेंबर विधान भवन मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आदीसह मान्यवर उपस्थित होते.
आमदार तनपुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याने राहुरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आनंद व्यक्त केला.

मुंबईमध्ये पुरस्कार वितरण सोहळा सुरू असताना. राहुरी शहरांमध्ये नगरपरिषदेसमोर, केशर डेरी, कृषी उत्पन्न बाजार समिती, आमदार प्राजक्त दादा संपर्क कार्यालय, आदीसह राहुरी,नगर व पाथर्डी तालुक्यातील गावागावात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
हा बहुमान मी राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता, आई-वडील तसेच वडीलधाऱ्या नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. जनहिताचे काम करण्यासाठी मिळालेली ही उर्जा आपल्या सर्वांच्या साथीने अक्षय्य राहील हा विश्वास आहे.अशी प्रतिक्रिया आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.













