सेवानिवृत्त शिक्षक मारुती माधव शेळके यांचे उद्या प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली…
शेळके परिवार मूळ पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावचा.. अनेक वर्षांपूर्वी ब्राम्हणी गावात ते कायमचे स्थायिक झाले. शेळके मामांची चौथी पिढी आज ब्राम्हणी गावात सर्वांशी सलोख्याने राहत आहे.
सेवानिवृत्त शिक्षक मारुती शेळके यांची ओळख ब्राह्मणी परिसरात शेळके मामा अशी होती.जुनी सातवी पास असलेले शेळके मामा… शिक्षक म्हणून रुजू झाले.
गळनिंब,कात्रड व ब्राह्मणी मध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम केले. अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपलं नाव कमावलं.
शेळके मामांना एक मुलगा व दोन मुली ….
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांचे ते वडील होय. अशोक सहकारी कारखान्यात बाळासाहेब शेळके यांनी काही काळ काम केले. माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्या समवेत राजकीय वाटचाल सुरू करत विविध पदावर काम केले. तनपुरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख कायम आहे.स्व. मारुती शेळके मामांचे विचार पुढे घेवून जाण्याचे काम त्यांचे कुटुंबात करत आहे…