ब्राम्हणी : वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा ब्राम्हणी गावात मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रारंभी सौ.संगिता व श्री.प्रसाद कोरडे यांच्याहस्ते पूजा करण्यात आली.हरिनामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली.अशोक कोरडे यांच्या निवासस्थानी भजनी मंडळास अल्पोहार देण्यात आला.यावेळी अशोक कोरडे,वसंत कोरडे,दत्तात्रय कोरडे,बाळासाहेब कोरडे,बाबासाहेब कोरडे,अशोक वाघ,सुखदेव वाघ,ओम सुनील
वानखेडे व समस्त नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.













