वांबोरी : ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी युवा नेतृत्व तुषार संभाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच किरण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 18 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया बैठक पार पडली.
दरम्यान तुषार मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ग्राम विकास अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीकांत साळे यांनी मोरे यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी सदस्य संगीता किसनराव जवरे, मंजुषा पोपट देवकर, द्वारकाबाई शंकर मोरे, मंदाबाई बाबासाहेब भिटे,नितीन बाफना,सारंगधर पटारे,गोरक्षनाथ ढवळे, ईश्वर कुसमुडे,ऋषिकेश मोरे,नवनाथ गवते आदी सदस्य उपस्थित होते.राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या वांबोरी ग्रामपंचायत महत्वाची समजले जाते. चार वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाला 11 तर,जेष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनविकास मंडळाला 6 जागा मिळाल्या.यामध्ये राखीव जागेचे सरपंचपद पाटील गटाकडे गेले.तर,संख्याबळ अधिक असताना जनसेवा मंडळाला उपसरपंच पदावर समाधानी राहावे लागले. प्रथम उपसरपंच पदाचा मान जनसेवा मंडळाचे नेते झेडपीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी मंदाताई भिटे यांना दिला.त्यांनी तीन वर्ष काम पाहिले. त्यानंतर दुसऱ्यांदी नितीन बाफना यांनी 9 महिने उपसरपंचपद भूषविले.चालू पाच वर्षात जनसेवा मंडळाने मोरे यांच्या रूपाने 3 ऱ्या सदस्याला संधी मिळाली.
जनसेवा मंडळाचे नेतृत्व बाबासाहेब भिटे, किसनराव जवरे,नितीन बाफना,एकनाथ ढवळे, प्रशांत नवले,कृष्णा पटारे आदी मंडळाचे नेतृत्व करत आहेत.
जनसेवा मंडळाने माझ्यावर जो विश्वास टाकला. तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेल. गट-तट न करता सर्वांशी समन्वय साधत गावाच्या विकासासाठी प्रयत्न राहील. वडील स्वर्गीय संभाजीराव मोरे यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून विविध कामे केली. त्यांचे विचार व वारसा या निमित्ताने पुढे घेऊन जाणार आहे. जनसेवा मंडळासाठी वडिलांचे योगदान व कार्याची जाणीव ठेवत आमच्या परिवारास यानिमित्ताने न्याय दिला. याची आम्हासही जाणीव राहील… असे मत नूतन उपसरपंच तुषार मोरे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना व्यक्त केले
















