ब्राम्हणी : ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी आज गुरुवारी निवड प्रक्रिया होत आहे. उपसरपंच पदासाठी अर्ज सादर करण्याच्या वेळीत दोन अर्ज दाखल झाले आहेत. जनसेवा मंडळाकडून सूर्यभान (भानूआप्पा) मोकाटे तर, जनविकास मंडळाकडून महेंद्र तांबे यांनी अर्ज सादर केले आहे.
जनसेवा मंडळाचे एकूण 10 तर जनविकास मंडळाचे लोकनियुक्त सरपंचपदासह आठ सदस्य आहेत. आज नेमकी काय होणार? मोकाटे बिनविरोध! की तांबे चमत्कार घडवणार? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.
ब्राह्मणी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक होवून आठ ते नऊ महिने झाले. लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक सुवर्णा बानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पंचवार्षिक मधील दुसऱ्या उपसरपंचपदासाठी निवड प्रक्रिया राबवली जात आहे.
सकाळी 10 ते 11 उमेदवारी अर्ज स्वीकारणे,11 ते 12 छाननी, 12 ते 1 उमेदवारी अर्ज माघारी घेणे, दुपारी 2 वाजता उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी माणिकराव घाडगे यांनी दिली.