Home क्राईम ब्राम्हणी : उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया

ब्राम्हणी : उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया

4
0

ब्राम्हणी : ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी आज गुरुवारी निवड प्रक्रिया होत आहे. उपसरपंच पदासाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत दोन अर्ज दाखल होते.जनसेवा मंडळाकडून सूर्यभान (भानूआप्पा) मोकाटे तर, जनविकास मंडळाकडून महेंद्र तांबे यांनी अर्ज सादर केले होते.

निवडणूक प्रक्रियेनुसार सकाळी 10 ते 11 यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल झाले.11 ते 12 छाननी प्रक्रिया, 12 ते 1 उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असताना ब्राह्मणी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य व सोसायटीचे चेअरमन महेंद्र तांबे यांनी अर्ज माघारी घेतला. दुपारी 2 वाजता उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असून आता सूर्यभान मोकाटे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.लवकरच घोषणा होईल अशी माहिती ग्रामविकास अधिकारी माणिकराव घाडगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here