ब्राम्हणी — सजाचे कोतवाल ज्ञानेश्वर बाबासाहेब खुळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली.
श्री.खुळे वळण गावचे असून त्यांचे शिक्षण Msc Maths,B.ed. आहे. गत 11 महिन्यापूर्वी सर्वाधिक 82 गुण मिळवून त्यांची ब्राम्हणी कोतवाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.एक अभ्यासू होतकरू तरुण म्हणून कामगार तलाठी जालिंदर पाखरे व महसूल मंडळ अधिकारी विश्वास आढाव यांच्यासोबत काम केले..नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत त्यांनी चांगले गुण मिळून शिक्षक होण्याचा बहुमान मिळविला..अधिकृत ऑर्डर प्राप्त होताच पालघर जिल्ह्यात ते शिक्षक म्हणून कार्यरत होतील.एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने एकाच वर्षातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा इतिहास केला.. वडील शेतकरी तर त्यांचे बंधू कोर्टात क्लार्क म्हणून काम पाहत आहेत…














