Home अहमदनगर उपशिक्षणाधिकारी अखेर निलंबित

उपशिक्षणाधिकारी अखेर निलंबित

22
0

 

अहिल्यानगर : माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी तथा राहुरी व जामखेडचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांना निलंबित करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी असताना धनवे यांच्याविरोधात एका शिक्षिकेने तक्रार केली होती. धनवे आपणास जाणूनबुजून त्रास देतात, असे तक्रारीत म्हटले होते. त्यावरून महिला तक्रार निवारण समितीने ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांची चौकशी केली.

चौकशीत तथ्य असल्याचा अहवाल समितीने जामखेड गटविकास अधिकारी,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी यांना पाठवला होता. जिल्हा परिषदेने हा अहवाल शासनाकडे पाठवल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव टि. वा. करपते यांनी धनवे यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
निलंबन काळात धनवे यांचे मुख्यालय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) असेल, तसेच त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here