डॉ.राहुल मोकाटे यांचे प्रथम पुण्यस्मरण
ब्राम्हणी : गावातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. राहुल ज्ञानदेव मोकाटे यांचे उद्या गुरुवार 10 ऑक्टोबर रोजी प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली…
२१ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ.मोकाटे याचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण ब्राह्मणी गावासह परिसरावर शोककळा पसरली होती. डॉ.राहुल मोकाटे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. कोणीही रूग्ण रात्री अपरात्री कधी आले किंवा फोन केला तर एका फोनवर धावून येत त्यांनी त्या रूग्णांवर वेळेवर उपचार करत असे अनेकांचे प्राण वाचवले. तसेच कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. कोणीही घराबाहेर निघण्यास तयार नव्हते. परंतु आपण समाजाचे काही तरी,देणे लागतो हा ध्यास मनी बाळगून डॉ.मोकाटे यांनी कोरोना काळात उत्तम कामगिरी केली व रूग्ण हिच ईश्वर सेवा मानून अविरतपणे सुरू ठेवली. त्यांनी ज्ञानी क्लिनिक च्या माध्यमातून तब्बल 18 वर्षे रुग्णसेवा केली. दि.२१/१०/२०२३ रोजी रात्री अनेकांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टर यांची रात्री साडे नऊ वाजता त्यांची प्राणज्योत अखेर मालवली. त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दिनांक 10 ऑक्टोबर रोजी ब्राम्हणी येथे संत मालिका मंदिर येथे होणार असून ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी देवाची यांची किर्तनसेवा पार पडणार आहे.
डॉ. राहुल मोकाटे हे राहुरी जी पी असोसिएशन चे सदस्य होते. वैद्यकीय क्षेत्रासोबतच राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी कर्तुत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ब्राम्हणी येथील प्रगतिशील शेतकरी ॲड. ज्ञानदेव रामभाऊ मोकाटे यांचे जेष्ठ चिरंजीव तर आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य राजेश मोकाटे यांचे ते मोठे बंधू तसेच प्राध्यापक लक्ष्मणराव बिटाळ मुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव यांचे मेहुणे होते. त्यांच्या पश्चात आई निर्मला , वडील ज्ञानदेव , पत्नी डॉ शीतल , मुलगा शौर्य , पुतणी वीरा, भाऊ, भाऊजाई वर्षा , बहिण नितीशा, असा मोठा परिवार आहे.
















