Home अहमदनगर तनपुरे आहे त्याच पक्षात

तनपुरे आहे त्याच पक्षात

2
0

राहुरी आम्ही आहोत त्याच पक्षात आहे, अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. फक्त निवडणूकीतून मी माघार घेतली आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपूरे केले.

राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाची पोट निवडणूक अवघ्या दोन दिवसांनी होत आहे. निवडणूक चांगलीच रंगात आली. भाजपकडून अक्षय कर्डिले, शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे, वंचितकडून संतोष चोळके, तर चार अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहे. प्रत्येक उमेदवाराचा प्रचार अगदी शिगेला पोहचलाय.

भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ २० एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत माजी मंत्री प्राजक्त तनपूरे हे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र या बाबत माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांनी सांगीतले कि, मी आहे त्याच पक्षात आहे, इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. ही सार्वत्रिक निवडणुक नसून पोट निवडणूक आहे. तालूक्याचा व मतदार संघाचा विकास झाला पाहीजे. हा दृष्टिकोन समोर ठेऊन मी फक्त या निवडणुकी पुरती माघार घेतली आहे. मात्र पूढे काय भूमिका घ्यायची हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here