गणराज्य न्यूज वेब टीम
संपादक – गणेश हापसे
ब्राम्हणी : इयत्ता बारावी (सायन्स) शाखेचा 100% निकाल लागला.यावर्षी सायन्सला 69 विद्यार्थी होते. ब्राम्हणीतील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची सायन्स शाखेची विद्यार्थिनी निकिता बाबुराव हापसे या विद्यार्थिनीने सर्वाधिक 80.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
आदर्श विद्यालयात गत चार वर्षापासून इयत्ता 12 वीचा वर्ग सुरू आहे. आतापर्यंत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण मिळवित निकिताने एक नव रेकॉर्ड तयार केल आहे.
द्वितीय क्रमांक धनश्री अविनाश मोरे (77.83 टक्के) तर,प्रणाली श्रीकांत हापसे हिने 77.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. गतवर्षी प्रथम तीन मुले होती.
तर,यंदा तिन्ही क्रमांक पटकून मुलीच भारी ठरल्याचे चित्र पहायला मिळाले.
बारावी कला शाखेचा निकाल 97.61% लागला असून प्रथम क्रमांक कु. कोरके ज्ञानेश्वरी बाळासाहेब (79.17 टक्के) व कु.थोरात निशा नारायण (70.83 टक्के) तर,कु.जाधव समीक्षा गोरक्षनाथ (70.50 टक्के)
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य बोंबले सर,सुनील हापसे सर,
गणेश हापसे सर,रावसाहेब बाचकर सर,राहुल रणसिंग,योगेश बानकर सर,विशाल म्हसे,चंद्रभान पाटोळे,माधुरी गवांदे,सुनील गांधले सर आदींचे मार्गदर्शन मिळाले.












