गणराज्य न्यूज वळण (प्रतिनिधी) – केंदळ खुर्दचे माजी सरपंच व डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक अनिल सोपान आढाव यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल वळण ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी श्री. आढाव यांच्या सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष धनंजय आढाव, दत्तात्रय खुळे, एकनाथ खुळे, सुदाम शेळके, अविनाश बनकर, अशोकराव शेळके, पत्रकार वसंतराव आढाव, किशोर कार्ले, विजय आढाव, बबनराव कार्ले, गोपीनाथ खुळे गुरुजी, फकीरचंद फुणगे, ज्ञानदेव कार्ले, बाळासाहेब गोसावी, पवन खुळे, मधुकर आढाव, मधुकर कर्डिले, अरुण खिलारी, दत्तात्रय काळे, नितीन साळुंके, पोपट गोलवड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.













