Home राहुरी अनिल सावंत यांची निवड

अनिल सावंत यांची निवड

6
0

Ganrajya news ब्राम्हणी : गावचे रहिवाशी व छत्रपती शाहू महाराज वस्तीगृहाचे सचिव अनिल सिताराम सावंत यांची अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ राहुरी तालुका अध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

नाथपंथी गोसावी समाजातील एक होतकरू तरुणास तालुकास्तरावर काम करण्यास संधी मिळाल्याने ब्राम्हणीतील समाज बांधवांकडून आनंद व्यक्त होत आहे.

महासंघाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जो विश्वास दाखविला तो सार्थ करून दाखविण्याचा प्रयत्न राहील.समाजातील अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार असेल.असा विश्वास नूतन तालुकाध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यक्त केला.

निवडीबद्दल महासंघ युवक आघाडी अहिल्यानगर व ब्राम्हणी ग्रामस्थांसह उत्तम (दादा) शिंदे,जिल्हाध्यक्ष बाबाभाऊ शिंदे,संजय भाऊ सावंत,उमाकांत हापसे,मोहन शिंदे सर,शिवाजी सावंत,रोहित सावंत,सुरेश शेगर,गणेश शिंदे,अर्जुन शिंदे सर,तानाजी सावंत,मयूर शिंदे,सागर शिंदे आदींनी तालुकाध्यक्ष अनिल सावंत यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here