Home राहुरी बाल वैष्णवांचा रंगणार ब्राम्हणीत मेळा

बाल वैष्णवांचा रंगणार ब्राम्हणीत मेळा

65
0

ब्राम्हणी : आषाढी एकादशीनिमित्त सालाबादप्रमाणे स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलकडून उद्या बुधवार 17 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता ब्राम्हणी जुने बाजारतळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालबद्ध लेझीम, नयनरम्य पाऊली, अश्वाचे रिंगण, किर्तन,भजन, अभंग, नाटिका अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये विठ्ठल रुक्मिणीसह विविध साधुसंतांच्या भूमिका साकारणारे विद्यार्थी दिसणार आहे. तरी आपण ग्रामस्थ,पालकांनी वारीमध्ये सहभागी व्हावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्राचार्य अश्विनी बानकर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here