गणराज्य न्यूज शनिशिंगणापूर – शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनासह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले साखळी उपोषण १३ टक्के पगारवाढीच्या आश्वासनानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.
९० टक्के कामगारांच्या मागण्या मान्य करून पूर्वी असलेल्या १४२ टक्के महागाई भत्त्यात १३ टक्क्याने वाढ करून यापुढे १५५ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कामगार वेतनश्रेणी झालेल्या चुकीची दुरुस्ती करून त्याचाही लाभ दिला जाईल आणि कोरोना काळातील असलेला वेतन
प्रश्नाचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर सुटले.
या संदर्भात कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कुठलेही पूर्तता व ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती, असे अध्यक्ष शामसुंदर शिंदे यांनी सांगितले.
उपोषण सोडण्याच्या वेळी अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे,विश्वस्त प्रा.शिवाजी दरंदले आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.













