गणराज्य न्यूज राहुरी
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाने आज शनिवार 26 जुलै रोजी सकाळी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स या किराणा दुकानावर छापा टाकला असून गुटक्यासह मावा बनवण्याची मशीन असा सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतल्याने अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.यामधे अवैधरित्या मावा बनवण्याची मशीन,सुपारी,विमल पान मसाला एक चार चाकी रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला असून पवण उर्फ पृथ्वीराज दगडुसिंग गिरासे या आरोपीला ताब्यात घेतले आहे.













