सोनई : कांगोणी येथील संतनगर येथील सुडके महाराज आश्रमात बाळकृष्ण महाराज सुडके यांच्या संकल्पनेतून दोन दिवसीय रामायण चित्र प्रदर्शनास चौदा विद्यालयातील विद्यार्थी, परीसरातील ग्रामस्थ व भाविकांनी भेट देऊन प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला.
आश्रमात घोडेगाव येथील ज्ञानमाऊली विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.ओंकार महाराज सुडके यांनी आश्रमाच्या वतीने राबविण्यात येत असलेले धार्मिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सोनई येथील आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले,सचिव संजय गर्जे, कांगोणीचे माऊली सोनवणे, रामचंद्र ठोंबळ,’ज्ञानमाऊली’ चे शिक्षक नवनाथ शिंदे उपस्थित होते.
प्रदर्शनात वाल्मिक ऋषी – नारद भेट, श्रावणबाळ वध,रामजन्म, विश्वामित्र भेट,सिता स्वयंवर, अहिल्या उध्दार,सीता हरण, वनगमन,हनुमंत भेट, श्रीराम-रावण युध्द, राज्याभिषेक यासह पन्नासहून अधिक आकर्षक रंगीत चित्र ठेवण्यात आले. प्रत्येक चित्राबद्दल सुडके महाराज यांनी विद्यार्थ्यांना माहीती दिली. आश्रमाच्या वतीने नाश्ता देण्यात आला. दोन दिवसीय प्रदर्शन पाहण्यास नऊशे विद्यार्थी व पाचशेहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती.
अयोध्येत नुकताच प्रभु श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा झालेला असल्याने प्रदर्शन पाहण्यास आलेले प्रत्येक विद्यालयातील विद्यार्थी जय श्रीराम नामाचा जयघोष करीत प्रवेश करीत होते.
विद्यार्थ्यांस सर्वप्रथम रामकृष्ण हरी म्हणून अष्टगंध लावण्यात आला. चित्र प्रदर्शन पाहताना विद्यार्थ्यांनी ‘प्रभू श्रीराम चंद्र की जय’ ‘हर घरमे एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते.
———————————-