गणराज्य न्यूज ब्राम्हणी
जीवनात आई- बाप श्रेष्ठ आहेत. लेकरांचं सुख माता पित्याच सुख असत.आपल्या मुलांना घडविणारे कैलासवासी गजाराम लुमाजी पाटोळे भाग्यवान आहेत.धर्म सेवेप्रमाणे देशसेवा महत्वाची आहे.त्या भारतमातेच्या सेवेसाठी मेजर जालिंदर पाटोळे यांच्या रूपात एक मुलगा सैन्य दलात पाठविला. हे निश्चित कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केले.
ब्राम्हणी सोसायटीचे माजी चेअरमन कैलासवासी गजाराम पाटोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त साई व्यंकटेश लॉन्स येथे किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी आपल्या कीर्तनातून आई बाप सांगत असतानाच अध्यात्मिक परमार्थिक सेवेची गरज काय हे स्पष्ट शब्दात सांगितले. वडील गजराम पाटोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांची मुले मेजर जालिंदर पाटोळे व नारायण पाटोळे यांनी विविध मंदिर,पायी दिंडी सोहळ्यास देणगी दिली.
उपस्थित सर्वांच्या वतीने हभप सदाशिव महाराज तोगे,सुभेदार फाटके,वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेश हापसे यांनी केले.गजाराम पाटोळे यांच्या जीवनकार्य व पाटोळे परिवाराबाबत सविस्तर माहिती पत्रकार गणेश हापसे यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी राजकीय,सामाजिक,कृषी, धार्मिक,शैक्षणिक,आजी माजी सैनिक,देवगड सेवेकरी परिवार,ब्राम्हणी ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.













