ब्राम्हणी :विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला.
26 जुलै कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस शाळेमध्ये साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवसाची माहिती दिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
याप्रसंगी मेजर कवडे यांनी विद्यार्थ्यांना कारगिल दिवस तसेच देश सेवेचे महत्व सांगितले. शाळेच्या प्राचार्या अश्विनी बानकर यांनी कवडे मेजर यांचा सत्कार केला. देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस व भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या शौर्य,पराक्रमाला सलाम करण्याचा दिवस आहे. असे वक्तव्य करत सर्वांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.














