गणराज्य न्यूज वांबोरी : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मुळा डावा कालवा सिंचन शाखेचे कर्मचारी अशोक भाकरे यांचा सेवापूर्ती सोहळा रविवारी सायंकाळी वांबोरी इरिगेशन कॉलनीत मोठ्या उत्साह पार पडला.
प्रारंभी उपस्थित सर्वांनी अशोक भाकरे व परिवारच कार्यक्रमस्थळी स्वागत केले. कुटुंबातील महिलांनी अशोक भाकरे यांचे औक्षण केले.भाकरे गुरुजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर, संतोष अशोक भाकरे यांनी सर्वाचे स्वागत केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रविकिरण पटारे, मुळा पाटबंधारे विभागातील सचिन थोरात, प्रवीण मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.अशोक भाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती सहकारी कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत दिली.
2 जुलै रोजी मुळा पाटबंधारे विभागाच्या वतीने शासकीय कार्यक्रम पार पडला. 27 जुलै रोजी सायंकाळी कौटुंबिक नातेवाईक, वांबोरी ग्रामस्थ,मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांचा सत्कार केला.अशोक भाकरे यांच् जीवन कार्य व संपूर्ण कौटुंबिक माहिती प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी दिली.यावेळी अशोक भाकरे यांनी सत्कार सोहळ्यास प्रसंगी मनोगत व्यक्त करत केलं.भविष्यात सामाजिक,धार्मिक क्षेत्रात काम करत कुटुंबासाठी वेळ देणार असल्याचे म्हटले.
याप्रसंगी मातोश्री लहानबाई भाकरे, बंधू दिली भाकरे, सौ मंगल अशोक भाकरे, सौ
सुनिता दिलीप भाकरे,बहीण रंजना सुरेश जोशी, कुसुम गजाबापू भांड,मुलगी रोहिणी संदीप खडके, मुलगा संतोष भाकरे,सुन शिवकन्या संतोष भाकरे आदी परिवारातील सदस्यांनी सर्वाचे स्वागत करत कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रम कमी वेळेत अतिशय सुंदर पार पडला. भोजन व्यवस्था इव्हेंट मॅनेजमेंट उत्कृष्ट ठरले. याबद्दल उपस्थित सर्वांनी संतोष भाकरे व मित्र परिवाराचे विशेष कौतुक केले.













