राहुरी : महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंञी तथा अर्थ व नियोजन मंञी अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या राहुरीमधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या वतीने बेरोजगार तरूणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.तालुक्यातील बेरोजगार तरुणाने या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन युवक तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी केले आहे.
उद्या रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून राहुरी टाकळीमिया-रोडवरील रघुनंदन लॉन्स, वाघाचा आखाडा या ठिकाणी तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून यामधे आहिल्यानगर तसेच संभाजीनगर, पुणे आदि परीसरातील १०० हुन नामवंत कंपण्यांचा यामधे सहभाग असणार आहे. यामधे १८ वयापासून पुढे कमीत-कमी पाचवी पास ते पदवीधर तसेच शिक्षक घेत असलेल्या सर्व उमेद्वार मुलाखत देण्यासाठी पाञ असणार आहेत. या सर्व कंपण्यांमधे प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बॅकींग,फायनान्स, रिटेल,बीपीओ, फॅसिलिटी मॅनेजमेंट, हाॅस्पिटल, हाॅटेल, इन्शुरन्स, टेलिकॉम, पाॅवर, सिक्युरिटी, मेडिकल इत्यादी श्रेञातील नामवंत कंपण्यांचा सहभाग असणार आहे. या सर्व कंपन्यांमध्ये विविध पन्नास प्रकारचे जॉब प्रोफाइल साठी त्याच दिवशी मुलाखती होऊन जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना नियुक्तीपत्र त्याच ठिकाणी दिले जाणार आहेत. या मेळाव्यासाठी ७ जुलै ते १८ जुलै पर्यंत सर्व उमेदवारांनी
७३५०११५५५५,९५६१८८३३३९ या क्रमांक किंवा
https://forms.gle/gK5FvkRwYB41mXi9 या संकेत स्थळावर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आहे.