राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कृषी महाविद्यालय भानसहिवरेच्या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा सुरेश बानकर, ग्रामसेवक माणिकराव घाडगे व शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर विद्यार्थी कृषिदूत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी ब्राम्हणी येथे आले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, भानासहीवरे येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कार्यक्रम समन्वयक प्रा.मनोज माने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत चव्हाण तन्मय , रामहरी कुटे, विवेक कर्डिले,अभय जोशी ,सूरज दांडेकर , प्रज्वल कांचन हे थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषिदूतांनी अभ्यासलेल्या माहितीचा व ज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील मातीपरीक्षण,फळबाग व्यवस्थापन, आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश तूरमठभट, प्रा. एम. आर.माने, प्रा. यू. व्ही. महाजन, आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील सर्व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे .
ब्राम्हणी परिसरात विविध उपक्रम विद्यार्थी राबवित आहेत.21 जून पासून गावातील युवकांना योगा प्रशिक्षण देत आहेत. शेतकऱ्यांसमवेत कृषी दिन साजरा केला.