गणराज्य न्यूज नाशिक: महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र ब्राह्मणी गावच भूषण श्रीकृष्ण इंडस्ट्रीचे चेअरमन महेंद्र हापसे पाटील यांना महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड देवून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी,जीएसटी ऑफिसर समाधान महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी हापसे, मुलगा कैवल्य हापसे,मुलगी कार्तिकी हापसे,भाचे ओम ढोकणे आदी उपस्थित होते.
मानाचा बिजनेस क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल महेंद्र हापसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.12 वर्षापासून महेंद्र हापसे विविध टप्प्यातून आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल राहुरी तालुक्यासह ब्राह्मणी ग्रामस्थांना निश्चित अभिमान वाटत आहे.













