गणराज्य न्यूज सोनई : शनैश्वर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी २८ जुलै रोजी पहाटे शनिशिंगणापूर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत शेटे यांच्या आत्महत्याप्रकरणी शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त व शेटे यांच्या जवळच्या नातेवाईक, अशा सुमारे दहा जणांचा जबाब शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी नोंदविला.
शनैश्वर देवस्थानात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेले नितीन शेटे यांच्या
आत्महत्येमुळे देवस्थान परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. या चौकशीचा भाग म्हणून शनिवारी मृत नितीन शेटे यांच्या पत्नीचे भाऊ, मुलगा इतर नातेवाइकांची चौकशी झाली. त्यांच्या पत्नीचा जबाब अजून बाकी आहे.
देवस्थानच्या विश्वस्तांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. आजवर दहाजणांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी दिली.













