
अहिल्यानगर
राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक तालुका राहुरी येथे केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल श्रीमती शिल्पा उदेभान राणे – ठाकरे यांना 2024 चा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार मिळाला आहे.
आज शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,आमदार संग्राम जगताप आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी श्रीमती शिल्पा उदेभान राणे – ठाकरे यांचे पती श्रीरामपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे व परिवारातील सदस्य उपस्थित होते.












